ताज्या बातम्या

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.

त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही.

तसेच विक्री वाढल्याने राज्याच्या महसुलात देखील वाढ होणार आहे. यामुळे आता वाईन कँपीटल असलेल्या नाशिक च्या वाईन ची चव आता देशभरात सर्वत्र चाखता येणार आहे. संपुर्ण देशात वाईन पुरविणाऱ्या महाराष्ट्र शासनाने २७ जानेवारी रोजी वाईन उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतला आहे.

पुर्वी फक्त लिकर शाँपी आणि बियर शाँपीमध्येच वाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांची संख्या कमी होती. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे किराणा दुकान, माँल्स, शोरुम मध्ये देखील वाईन उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र यासाठी विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन सर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.

राज्यातील ८० उद्योजकांच्या आशा पल्लवीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काटेकोर निर्णयामुळे वाईन उत्पादकांसमोर समस्या नेहमी असतात.

मात्र राज्यशासनाने गुरुवारी घेतलेल्या निर्णयामुळे वाईन विक्री मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने राज्यातील ८० उद्योजकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात ४५ उद्योजक असुन उर्वरित राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आहे.

Ahmednagarlive24 Office