अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
पोखरी बाळेश्वर येथील अनिता धनंजय डोळस (वय 24) हिचे धनंजय दगडू डोळस (रा.मांजरवाडी, नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे) याच्याबरोबर 2018 मध्ये लग्न झालेले आहे.
पहिले तीन-चार महिने व्यवस्थित नांदविले. त्यानंतर 21 जानेवारी, 2020 पासून आजपावेतो सासरी नांदत असताना माहेराहून चारचाकी वाहन घेण्यासाठी चार लाख रुपये आणावे; या कारणावरुन पती धनंजय डोळस,
सासू शशीकला दगडू डोळस, नणंद दीपिका अभिजीत शिंदे, अभिजीत प्रकाश शिंदे यांनी सतत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करुन घराबाहेर काढून दिले.
या प्रकरणी पीडित विवाहिता अनिता डोळस हिने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार आदिनाथ गांधले हे करत आहेत.