Personal Loan : आजकाल अनेकांना पैशाची गरज असल्यास कर्ज काढत असतात. मात्र कर्ज काढताना अनेक बँकांचे व्याजदर जास्त असते. त्यामुळे कर्ज घेणे अनेकांना परवडत नाही. तसेच अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज काढत असतात.
बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर तुम्ही त्याची नियमितपणे फेड करून तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर बनवू शकता. अनेक बँका वैयक्तिक कर्ज सुविधा पुरवत आहेत. त्यासाठी काही कागदपत्रांची मागणी केली जाते.
तसेच काही बँकांचे व्याजदर अधिक असल्याने अनेकजण कर्ज घेण्याकडे पाठ फिरवतात. मात्र आता खालील बँक कमी व्याजदराने ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवठा करत आहे. यामुळे ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र
या बँकेतील वैयक्तिक कर्जावरील प्रारंभिक व्याज दर 9.25 टक्के आहे. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत दिले जाऊ शकते. बँकेतील कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.10 टक्क्यांपासून सुरू होतो. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत उपलब्ध असेल. बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.
IDBI बँक
या बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 15.50 टक्के व्याजदर आहे. व्याजाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांचा असेल.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 16.70 टक्के व्याजदर आहे. बँकेतील कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत आहे. बँकेतील वैयक्तिक कर्जाचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत असतो.
IDFC फर्स्ट बँक
या खाजगी बँकेत वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के व्याजदर आहे. या बँकेतील कर्जाचा कालावधी 6 ते 60 महिन्यांचा असेल. कर्जाची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत आहे.
फेडरल बँक
या खाजगी बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के ते 17.99 टक्के व्याजदर आहे. बँकेत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. कर्जाचा कालावधी ४८ महिन्यांचा असेल.