ताज्या बातम्या

पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरूच ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल झाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर आजही प्रत्येकी ३५ पैशांनी वाढले. देशात पेट्रोल डिझेल विक्रमी महाग किंमतीत विकलं जातं आहे.

मुंबईत पेट्रोल ११५ रूपये ५० पैसे तर डिझेल 106 रूपये 62 पैशांनी विकलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर ९० डॉलर प्रती बॅरल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे देशात हे कडाडलेले तर कमी होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दररोज वाढ होत आहे. आज देखील 36 पैशाने पेट्रोल तर डिझेलमध्ये 39 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडला आहे.

शहर पेट्रोल डिझेल

दिल्ली 109.69 98.42

मुंबई 115.50 106.62

चेन्नई 110.15 101.56

कोलकाता 106.35 102.59

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office