अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. सध्या पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केलीय त्यामुळे महागाईचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

असं असलं तरी जगात असं एक ठिकाण आहे जिथं पाण्याच्या किमतीपेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल मिळतं जगात सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल कुठं आहे, भारतापेक्षाही महाग पेट्रोल डिझेल कोणत्या देशात आहे आणि आपल्या शेजारी देशांमध्ये पेट्रोलचे दर काय आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

पेट्रोलविषयी बोलायचं झालं तर जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएला या देशात आहे. आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्ही अगदी 50 रुपयात कारची टाकी फुल करु शकता. हो तुम्ही बरोबर ऐकलात, हे असं शक्य आहे ते व्हेनेझुएलामध्ये.

येथे तुम्ही भारतीय रुपयात बाइकमध्ये फक्त 21 पैसे खर्च करून तुमच्या बाईकमध्ये एक लिटर पेट्रोल टाकू शकता. एनर्जी सेक्टरच्या वेबसाइट www.globalpetrolprices.com नुसार, व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत फक्त $ 0.02 आहे.व्हेनेझुएलाच्या चलनात पेट्रोलची किंमत 5000 बोलिव्हर प्रति लिटर आहे.

त्यामुळे जर तुम्ही त्याला भारतीय रुपयांमध्ये $ 0.02 विभाजित केले तर ही किंमत फक्त दीड रुपये आहे. दुसरीकडे, जर तुम्ही बोलिव्हरची तुलना भारतीय चलनाशी केली तर ही किंमत फक्त 21 पैसे प्रती लिटर आहे.

याचे कारण असे की, अलीकडील एक्सचेंज रेटनुसार, सध्या 23733.95 बोलिव्हर एका भारतीय रुपयामध्ये मोजले जाते.दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशात अनेकदा पेट्रोलची किंमत खूप कमी असते.

या देशांत मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल –

सौदी :- अरब सौदी अरबमध्ये पेट्रोलचा दर १५.३८ रुपये प्रति लिटर आहे. हा जगातील दहावा सर्वात श्रीमंत देश आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यात चांगले संबंधही आहेत. या ठिकाणी ९५% वाळवंटच आहे. या देशात पाण्याची किंमतही पेट्रोलपेक्षा अधिक आहे.

तुर्कमेनिस्तान :- तुर्कमेनिस्तान हा एक असा देश आहे ज्याची लोकसंख्या भारतातील एखाद्या लहान राज्यापेक्षाही कमी आहे. या ठिकाणी पेट्रोल १८.५८ रुपये प्रति लिटर या दराने मिळतं. या देशात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत.

अल्जेरिया :- हा जगातील दहाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. या ठिकाणी पेट्रोल २०.५१ रुपये दराने मिळतं. या देशात मुख्यत: तीन भाषा बोलल्या जातात. अरबी, फ्रेंच आणि बर्बर या भाषा आहेत.

कुवैत :- कुवैत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत देश आहे. या ठिकाणी पेट्रोलचा दर प्रति लिटर २२.४३ रुपये आहे. या देशातील ९५ टक्के तेलसाठा हा निर्यात केला जातो. तर एकूण महसूलापैकी ८० टक्के महसूल हे तेल आणि तेलापासून बनविलेल्या पदार्थांपासून मिळतं