ताज्या बातम्या

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केले इंधनाचे दर! ‘या’ शहरात वाढल्या डिझेलच्या किमती, पहा नवीन दर

Petrol Diesel Price : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करत असतात.

आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार शहरांमध्ये अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणता बदल झाला नाही. मात्र काही शहरात डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.

जर शहरांबद्दल बोलायचे झाले तर, चंदीगडमध्ये पेट्रोल सर्वात कमी किंमत 96.20 रुपये प्रति लिटर आहे. सर्वात महाग पेट्रोल केरळच्या त्रिवेंद्रम येथे 109.73 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्ली इथे पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लीटर, तर नोएडा आणि गुरुग्राममध्ये पेट्रोल दिल्लीपेक्षा 96.53 रुपये प्रति लिटरने थोडे स्वस्त असून गुरुग्राममध्ये ते 97.10 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर दुसरीकडे, या दोन शहरांमध्ये डिझेलच्या किमतीत फारसा बदल झाला नाही. नोएडा येथे डिझेल 89.93 रुपये प्रति लिटर झाले होते, तर गुरुग्राममध्ये डिझेलचे दर 89.84 रुपये प्रति लिटर आहे.

अंदमान आणि निकोबारमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी 84.10 रुपये प्रति लिटर आहे. आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त 111.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. लखनौच्या तुलनेत बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल तसेच डिझेल दोन्ही महाग आहेत. तर पाटणामध्ये पेट्रोल 107.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर इतके आहे. लखनऊ येथे पेट्रोलचा दर 96.57 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर इतका आहे.

केंद्र सरकारकडून 2010 मध्ये पेट्रोल आणि 2014 मध्ये डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्यात आले, त्यानंतर तेलाच्या किंमती निश्चित करणे पूर्णपणे तेल कंपन्यांच्या हातात गेले. तेल कंपन्या जगभरातील प्रचलित कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे किरकोळ किमती ठरवत असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts