file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- देशात सरकारी तेल कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.  आज देशभरातील विविध शहरात पेट्रोलचे दर तब्बल 110 रुपये प्रति लीटरच्या जवळपास आहेत.

सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 109.54 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 99.92 रुपये आहेत.

दिल्ली पेट्रोल 103.54 रुपये आणि डिझेल 92.12 रुपये प्रति लीटर

मुंबई पेट्रोल 109.54 रुपये आणि डिझेल 99.92 रुपये प्रति लीटर

चेन्नई पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 96.60 रुपये प्रति लीटर

कोलकाता पेट्रोल 104.23 रुपये आणि डिझेल 95.23 रुपये प्रति लीटर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही.

त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो.

बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.