Petrol Diesel Price Today : महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असल्याने त्या नियमितपणे सुधारित करण्यात येतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारले जातात.
आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जाणून घ्या देशातील महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
सध्या दिल्ली शहरामध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबई शहरामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नई शहरामध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
या ठिकाणी मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल
राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जात आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
या ठिकाणी मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जात आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
जाणून घ्या आजचे नवीनतम दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत
पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. या तेजीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $74 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $79 च्या जवळ पोहोचले असून जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. परंतु देशात यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही घट झाली नाही.
उत्पादन शुल्कात कपात
केंद्र सरकारकडून यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. केंद्रा सरकारच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली होती.