पेट्रोल डिझेल च्या किमती आज ‘जैसे थे’ ; जाणून घ्या आजचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)चे दर ‘जैसे थे’ आहेत.

हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. आज दिल्लीत, पेट्रोलचे दर 20 पैसे प्रति लीटर वाढून 101.39 रुपये प्रति लीटर झाले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 89.57 रुपये प्रति लीटर झाला आहे.

 महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या

दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.39 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 89.57 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 101.87 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लीटर डिझेल 92.67 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 107.47 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 97.21 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 99.15 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लिटर डिझेल 94.17 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत – परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

 पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन ;- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.