अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या दराने ९७ रुपये, तर डिझेलच्या दराने ८८ रुपयांची उंची गाठली आहे.
पेट्रोलच्या दरात विक्रमी ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३७ पैशांची वाढ झाली आहे. सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहिल्याचे दिसून आले आहे. २०१७ मधील दरवाढीचा आढावा घेतल्यानंतर तेल कंपन्यांनी एका दिवसात सर्वाधिक वाढ झाल्याचे मत नोंदवले आहे.
त्याचबरोबर दिल्ली येथे पेट्रोलच्या किमती ९०.५८ रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत ९७ रुपये करण्यात आल्या आहेत. तर दिल्लीत डिझेलचे दर ८०.९७ रुपये आकारण्यात येत असून मुंबईत ८८.०६ रुपये दरवाढ झाली आहे.