अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- आपण आधीपासूनच प्रदुषणाचा सामना करीत आहोत. वृक्षतोडीमुळे आणखी त्यामध्ये भर पडते. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व समजले, त्यामुळे आता वृक्षारोपणासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे.
निसर्गचक्र टिकविण्याकरीता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. सावेडी उपनगरात प्रभाग 2 मधील श्रीराम चौक ते वसंत टेकडी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा 25 वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी मनपाचे नवनिर्वाचित उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी पालवे, अरिफ सय्यद, सुरेश बनसोडे, उद्योजक दिपक लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, थोडेच काम करा पण चांगले करा. केवळ 5 जून पर्यावरण दिवशीच झाडे लावून फोटोसेशन न करता प्रत्येकाने एकतरी झाडा लावा, पण त्याचे संवर्धन करा. वृक्षांमुळे अनेक जीवांचे अस्तित्व आहे.
वृक्षांमुळे अनेकांचा उदरनिर्वाह झाडांची फळे विकून पैसे कमवून होत असतो. तेव्हा वृक्षे लावा वृक्षे जगवा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्तकविकात कबीर केकचे संचालक व या 25 वृक्षांचे पालकत्व स्विकारणारे राजन चेमटे म्हणाले, आमच्या प्रभागातील माजी नगरसेवक निखिल वारे यांनी श्रीराम चौक येथील वृक्षारोपण आणि परिसर सुशोभिकरण अभियान संकल्पना राबवली.
त्यांना प्रतिसाद म्हणून नूतन उपमहापौर यांचा सत्कार आज 25 झाडे लावून करण्यात आला आहे. या परिसराचे सुशोभिकरण त्यामुळे होईल. ही झाडे जगविण्याची जबाबदारी जशी मी घेतली तशी ती टिकतील कशी याकडे सर्वांनी लक्ष देण्याची खरी गरज आहे.
यावेळी निखिल वारे म्हणाले, प्रभागात आम्ही विकास कामांबरोबरच सामाजिक कार्यातही सहभागी असतो. वृक्षारोपण करणे, आमची जबाबदारी आहे. लक्ष्मीनगर मार्निंग ट्रॅकवर 300 झाडे लावण्याचा उपक्रम राबवून तो यशस्वी केला आहे.
त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले. यावेळी सत्कारास उत्तर देतांना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, वृक्ष जगवली तर पृथ्वीचा विकास होईल. केवळ झाडे लावून फोटोसेशन न होता ती जगवली तरच वृक्षारोपण केल्याचे समाधान मिळेल.
मी स्वत: वृक्षप्रेमी असून, वृक्ष लावणे हाच संदेश सर्वांना देतो. आज सत्काराचे नियोजन केले तर झाडे लावा हा उद्देश होता, तो आज या भागातील नगरसेवकांनी सफल केला. श्री.निवृत्ती दातीर यांनी सूत्रसंचालन केले तर राजन चेमटे यांनी सर्वांचे आभार मानले.
मनपा वॉर्ड क्र.2 मधील श्रीरामचौक येथील वृक्षारोपण आणि परिसर सुशोभिकरण अभियान संकल्पना निखिल वारे यांची होती.
यावेळी हेमंत बल्लाळ, सुधाकर देशपांडे, रविंद्र पहिलवान, अजित महांडूळे, अतुल आंधळे, योगेश पिंपळे, सचिन वारे, गणेश गोरे, निखिल त्र्यंबके, धनंजय जाधव, सुरेखा चेमटे, डॉ.शुभांगी शिंदे आदिंसह महिला, नागरिक उपस्थित होते.