Shinde-Fadnavis : रात्रीस खेळ चाले ! शिंदे-फडणवीस यांच्यात रात्री बैठक; मंत्रिमंडळाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shinde-Fadnavis : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे.

मात्र या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणीही माहिती दिलेली नाही. मात्र या बैठकीमध्ये दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री तब्बल दीड तास चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्ह्याचा मुद्दाही चर्चेत आल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी दोघांमध्ये चर्चा झाली आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र आता या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रात्रीच्या बैठकीनंतर घडामोडींचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिपदन मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असल्याचीही चर्चा रात्री झाली असल्याचे समजत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्ह्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आव्हाडांवर मुद्दाम गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.