रुग्णांच्या जीवाशी खेळ ! केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर बंद पडतात, पूर्ण क्षमतेनं चालत नाहीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळखात पडून आहेत, अशी तक्रार पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा वाद आता रंगणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार असल्याने केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

यामुळे केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवताना कचराई करण्यात येत आहे, असंही या नेत्यांचं म्हणणं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काल एक पत्रक काढत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे.

‘महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे.

लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क,

पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत,’ असा आरोप पृथ्वीराज चव्हा यांनी केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24