अहमदनगर ब्रेकिंग : क्रिकेट खेळणे तरुणाच्या जीवावर उठले; टेरेसवरून पडून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्स गच्चीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेत अभिजीत दिपक सुखदरे (वय-२५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिजित हा लॅाकडाऊन असल्यामुळे त्याच्या मित्रांसह मेन रोड भागातील साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्सच्या समोरील मोकळ्या पटांगणात क्रिकेट खेळत होता.

यावेळी पोलीस आल्याने हे तरुण तेथून पळून गेले. परंतू अभिजित हा साई सुपर मार्केटच्या गच्ची वर जाण्यासाठी जिन्याने वरती गेला आणि चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन तो कॉम्प्लेक्सच्या वरील पत्र्यातुन थेट खाली फरशीवर पडला.

हे लक्षात येताच आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला कॉल केला. अभिजीतला ॲम्बुलन्समध्ये दाखल करत साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे नेण्यात आले.

तेथे डॉक्टर जगधने यांनी त्याला तपासले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेने श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ माजली आहे. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप हे तात्काळ हजर झाले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24