Tata Punch EV : ग्राहकांना सुखद धक्का! ‘या’ दिवशी लाँच होणार सर्वात स्वस्त कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Punch EV : बाजारपेठेत टाटा मोटर्स ही दिग्गज वाहन उत्पादक कंपनी आहे. या कांपनीच्या सर्व सेगमेंटमधील कार्सना प्रचंड मागणी असते. या कंपनीचे देशात 1 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या कंपनी आपले इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही सर्वात स्वस्त कार असण्याची शक्यता आहे. या कारमध्ये कंपनी जबरदस्त फीचर्स देऊ शकते.

नुकतीच टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे मार्केटिंग हेड विवेक श्रीवास्तव यांनी भारतात पंच EV लाँच करण्याची पुष्टी केली आहे. परंतु, Nexon EV नंतर टाटाच्या दुसर्‍या आगामी इलेक्ट्रिक SUV बद्दल कंपनीने कोणतेच तपशील उघड केले नाहीत. पुढच्या वर्षाच्या उत्तरार्धात हे मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते. पंच EV ही टाटा मोटर्सची Nexon, Tigor आणि Tiago EV नंतरची चौथी प्रवासी ईव्ही असणार आहे.

कशी असेल आगामी कार

या आगामी कारच्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर ही ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मॉडेलसारखीच असण्याची शक्यता आहे. परंतु, यामध्ये इलेक्ट्रिक कारचा लुक देण्यासाठी त्यात काही बदल करण्याची शक्यता आहे. ही कार कंपनीच्या EV पोर्टफोलिओमध्ये Tiago आणि Nexon मधील स्थानबद्ध असणार आहे. तसेच यामध्ये पेट्रोल व्हर्जनपेक्षा जास्त फीचर्स मिळू शकते.

पंच EV ची बॅटरी आणि रेंज

टाटाची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. जी ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असून 25 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. तसेच ती फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करेल.तर ही फक्त एका चार्जवर 250 ते 300 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

या कार्सना देईल कडवी टक्कर

या कारची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच ती देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असू शकते. ही कार बाजारपेठेत इतर कोणालाही टक्कर देणार नाही. पारंतू, काही प्रमाणात Nexon EV आणि XUV400 ला टक्कर देईल.