PM Kisan 13th Instalment : पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 13व्या हप्त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी आहे. नव्या गुड न्यूज अंतर्गत आता कोणत्याही शेतकऱ्याचे कोणतेही काम पैशांअभावी थांबणार नाही. वास्तविक, कृषी तंत्रज्ञान कंपनी ओरिगो कमोडिटीज आणि फिनटेक कंपनी विवृत्ती कॅपिटल यांच्यात करार झाला आहे.
100 कोटींचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट
दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार शेतकरी, कृषी व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांना कोणत्याही हमीशिवाय दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.
ओरिगो कमोडिटीजच्या वतीने सांगण्यात आले की, कंपनीने डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मार्च 2023 पर्यंत 100 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गुरुग्रामस्थित ओरिगो कमोडिटीज ही अॅग्री-फिनटेक कंपनी आहे. त्याची सुरुवात 2011 साली झाली आहे.
ग्राहक शोधात देखील मदत करेल
ओरिगो कमोडिटी सप्लाय चेन कापणीनंतरचे व्यवस्थापन, व्यापार आणि वित्तपुरवठा करते. कंपनीच्या जीएस (कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी) सान्या अग्रवाल यांनी सांगितले की, शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्यासाठी त्यांनी विवृत्ती कॅपिटलशी हातमिळवणी केली आहे. याशिवाय कंपनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषी उत्पादनांसाठी ग्राहक शोधण्यात मदत करेल.
त्यांनी सांगितले की ओरिगो कमोडिटीज देखील कृषी उत्पादनाची गुणवत्ता तपासेल. शेतकऱ्यांना 16 ते 17 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाईल. ओरिगो eMandi कॅश प्लॅटफॉर्मचा वापर कृषी उत्पादक आणि बँकांमधील एक माध्यम म्हणून करेल.