PM Kisan Yojana : ‘या’ तारखेला जमा होणार ११ व्या हफ्त्याचे पैसे, हे काम केले नसल्यास जमा होणार नाहीत पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होत आहे. केंद्र सरकारकडून (Central Goverment) लवकरच ११ व्या हफ्त्याची सोडत दिली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांना थोडेसे काम करावे लागणार आहे.

लाखो भारतीय शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) चा 11वा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये रोख हस्तांतरण प्रदान करते.

पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान येतो. नवीन वर्षाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी 10 वा हप्ता जारी करण्यात आला.

या योजनेंतर्गत देशातील आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना पाठवले जाऊ शकतात. केंद्र सरकारने अद्याप पैसे टाकण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही,

परंतु काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सरकार या योजनेचा 11 वा हप्ता 15 मे पूर्वी खात्यात टाकेल. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पोहोचतील.

फक्त हे लक्षात ठेवा

खरे तर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेत असेल तरच तुम्हाला पैसे पाठवले जातील. पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेत दोन मोठे बदल केले आहेत.

जर कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या पीएम किसान खात्याचे ई-केवायसी (E-KYC) मिळाले नाही, तर त्याच्या खात्यात 11 व्या हप्त्याची रक्कम सोडली जाणार नाही.

याशिवाय केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतही मोठा बदल केला आहे. आता तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी,

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतरच तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकाल.