PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हफ्ते जमा झाले आहेत.
दरम्यान, देशातील सुमारे 1.86 कोटी शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नसल्याची माहिती सरकारने दिली आहे. सरकारने यादी जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे.
6 महिन्यांत सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांची नावे काढली
12 व्या हप्त्यानंतर, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा डेटा साफ करण्यासाठी आधार-लिंक्ड फिल्टर लागू केले, त्यानंतर गेल्या 6 महिन्यांत सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.
13 वा हप्ता नवीन वर्षात येईल
सुमारे 10.45 शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचा लाभ मिळाला. त्याच वेळी, केवळ 8.58 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. 13व्या हप्त्याचे पैसे सरकार नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही हे तुम्ही पटकन तपासा.
अनेक राज्यातील शेतकऱ्यांची नावे काढली
आधार लिंकसह फिल्टर केल्यानंतर, यूपीतील सुमारे 58 लाख शेतकरी कमी झाले आहेत. त्याचवेळी पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या 17 लाखांवरून 2 लाखांवर आली आहे. केरळ आणि राजस्थानमधील 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावेही काढून टाकण्यात आली आहेत.
याशिवाय अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची नावे कमी करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांचा डेटा पारदर्शक करण्यासाठी अनेक फिल्टर तयार केले आहेत.
या लोकांना लाभ मिळणार नाही
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार जे शेतकरी संवैधानिक पदावर कार्यरत आहेत किंवा त्यांनी काम केले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय माजी, विद्यमान मंत्री, खासदार, आमदार, महापौर, पंचायत प्रमुख यांनाही लाभ मिळणार नाही. यासोबतच राज्यातील किंवा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि 10 हजारांहून अधिक मासिक पेन्शन घेणारे शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.