PM Maandhan Yojana : मोदी सरकारची भन्नाट योजना ! दरमहा तुमच्या खात्यात येतील 3000 रुपये; करा अशी नोंदणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांसाठी अनेक योजना राबवत असते. या योजेचा लाभ देशातील लाखो लोक घेत असतात. दरम्यान, मोदी सरकारची अशी एक योजना आहे जी तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळवून देईल.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Maandhan Yojana : जर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर मोदी सरकार तुमच्यासाठी एक मस्त योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पीएम मानधन योजना) हे आहे.

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 60 वर्षांवरील लोकांना पेन्शनची सुविधा मिळणार आहे. या योजनेंतर्गत दरमहा किमान तीन हजार रुपये दिले जातील. पेन्शन दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत लाभार्थीच्या पत्नीला किंवा पतीला पेन्शनच्या 50 टक्के रक्कम मिळेल.

मासिक उत्पन्न 15 हजारांपर्यंत असावे

जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटी दिलेल्या आहेत. यामध्ये जे दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत कमावतात. तसेच, योजनेत सामील होणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

या योजनेअंतर्गत तुम्ही पेन्शन योजनेत जी रक्कम जमा कराल, तीच रक्कम सरकारही जमा करेल. यामध्ये 55 ते 200 रुपये जमा करता येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी करणे अनिवार्य असेल.

बँक खाते, आधार कार्ड आवश्यक

या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे बंधनकारक असेल, तरच त्याला त्याचा लाभ मिळू शकेल. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएसीशी संपर्क साधावा लागेल. सदर योजनेची नोंदणी कुठे केली जाते. नोंदणीच्या वेळी आधार कार्ड, बँक खात्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

यानंतर तुमचा बायोमेट्रिक डेटा रेकॉर्ड केला जाईल. यासोबतच तुम्हाला तेथे एक कार्डही उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये श्रम योगी पेन्शन कार्ड क्रमांक दिला जाईल. भविष्यात, तुम्ही फक्त या नंबरद्वारे तुमच्या खात्याबद्दल माहिती गोळा करू शकाल.