ताज्या बातम्या

PM Narendra Modi Property: पीएम मोदींकडे ना गाडी आहे ना जमीन, आहे फक्त एवढी कॅश! जाणून घ्या येथे मोदींच्या संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती….

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Narendra Modi Property: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची एकूण संपत्ती 2.33 कोटी आहे. पीएम मोदींच्या संपत्तीत (PM Mod Wealth) गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे. इतकेच नाही तर त्यांनी गांधीनगरमध्ये (Gandhinagar) असलेली त्यांची जमीन दान केली. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही.

पंतप्रधान कार्यालयाच्या (Prime Minister’s Office) वेबसाइटवर पंतप्रधानांच्या संपत्तीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पीएम मोदींकडे असलेली बहुतांश चल संपत्ती बँकेत जमा आहे.

एवढेच नाही तर पीएम मोदींकडे कोणतेही बाँड, म्युच्युअल फंड (mutual fund) किंवा शेअर्स नाहीत. तसेच त्यांच्याकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही. मात्र पीएम मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या (gold rings) आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत 2.23 कोटी मालमत्ता होती –

31 मार्च 2021 पर्यंत पीएम मोदींकडे 2,23,82,504 रुपयांची जंगम आणि 1.1 कोटी रुपयांची रिअल इस्टेट मालमत्ता होती. त्यांनी आता रिअल इस्टेट दान केली आहे.

31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधानांकडे कोणतीही मालमत्ता नाही. त्यांची संपत्ती आता 2.33 कोटी झाली आहे. पीएम मोदींकडे 35250 रुपयांची रोकडही आहे. एवढेच नाही तर त्यांची 189305 रुपयांची आयुर्विमा पॉलिसी आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office