ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधानांपर्यंत तुमचे म्हणणे पोहोचण्यासाठी ‘ह्या’ मार्गांचा करा उपयोग

Published by
Ahmednagarlive24 Office
PM Modi :  प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात, ज्यासाठी सरकारने (government) वेगवेगळे विभागही तयार केले आहेत.
पण अनेकवेळा असे देखील घडते की कोणीही उच्चस्तरीय अधिकारी तुमची तक्रार किंवा बोलणे ऐकून घेत नाही, मग आम्ही काय करायचे? अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय (Prime Minister’s office) तुम्हाला मदत करू शकते.
खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi
) त्यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) याकार्यक्र मात देश-विदेशातून एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची ‘मन की बात’ पाठवल्याचा उल्लेख केला होता.
दहशतवादापासून मुक्तता, स्वच्छता अशा मुद्द्यांवर मुलांनी बनवलेले पोस्टकार्ड पंतप्रधानांपर्यंत पोहोचले आहे . अशा स्थितीत पंतप्रधानांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची असेल, तर त्यासाठी काही मार्ग आहेत.

तुम्ही तुमचा मेसेज याप्रमाणे पोहोचवू शकता:-

नंबर 1
तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी म्हणजेच PMO शी त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://www.pmindia.gov.in/en/ ला भेट देऊ शकता.

नंबर 2
तुम्हाला तुमचा मुद्दा देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नमो अॅपची (NaMo app) मदत घेऊ शकता. या अॅपद्वारे तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअरवरून (play store

) डाउनलोड करू शकता.

नंबर 3
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. फेसबुक अकाउंट https://www.facebook.com/narendramodi, Twitter: https://twitter.com/narendramodi आणि Instagram: https://www.instagram.com/narendramodi/?hl=en द्वारे देखील पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकतात

नंबर 4
तुम्हाला तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी 91-11-23019545, 23016857

या फॅक्सद्वारे संपर्क साधू शकता.

तुम्ही पीएमओच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहू शकता “नरेंद्र मोदी वेब इन्फॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल, नवी दिल्ली – 110011” याशिवाय तुम्ही connect@mygov.nic.in वर ईमेल देखील करू शकता.

Ahmednagarlive24 Office