ताज्या बातम्या

PM Rooftop Solar Scheme : वीजबिलाचे टेन्शन नाही ! घराच्या छतावर बसवा रुफटॉप सोलर पॅनल, सरकार देतंय 78 हजारांची सबसिडी, असा करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Rooftop Solar Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. आता केंद्र सरकारकडून पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांची वीजबिलासपासून सुटका होईल. या योजनेला सरकारकडून सबीसीडी देखील दिली जात आहे. तुम्ही याचा फायदा घेऊन पैशांची बचत करू शकता. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही मोफत वीज वापरू शकता.

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना

केंद्र सरकारकडून रूफटॉप सोलर स्कीमला मंजुरी दिली आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2024 मध्ये केली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अर्थसंकल्प सादर करताना या योजनेबाबत माहिती दिली होती. या योजनेंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे.

नागरिक आणि सरकार दोघांनाही फायदा होणार

देशातील नागरिक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून पैशांची मोठी बचत करू शकतात. जर तुमच्या या सौरऊर्जेपासून जास्तीची वीज तयार केली तर त्याचा फायदा सरकारलाही होणार आहे.

78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळणार आहे

केंद्र सरकारकडून सोलर पॅनल योजनेसाठी सबसिडी देखील दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देखील देण्यात आली आहे.

सरकारकडून 1 किलोवॅट सोलर पॅनल प्रणालीसाठी 30 हजार रुपयांची सबसिडी देईल. 2 किलोवॅटच्या पॅनेलसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॅटच्या सौर पॅनेलसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

अनुदानासाठी कसा करायचा अर्ज

सर्वात प्रथम https://pmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा.
त्यानंतर वीज वितरण कंपनीचे नाव, ग्राहक क्रमांक, मोबाईल आणि ईमेल टाका.
ग्राहक/ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने पोर्टलवर लॉग इन करा.
सोलर पॅनलसाठी अर्ज करण्यासाठी फॉर्म निवडा.
अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित डिस्कॉममध्ये नोंदणी केलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून पॅनेल स्थापित करा.
सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचा तपशील सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाईल ते प्रमाणपत्र सबमिट करा.
बँक खाते तपशील द्या.
बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडीची रक्कम जमा केली जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office