PM Yuva Yojana : तरुणांसाठी मोदी सरकारची जबरदस्त योजना ! मिळणार दरमहा 50 हजार रुपये; लगेच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Yuva Yojana : मोदी सरकार देशात नवनवीन योजना राबवत आहे. अशा वेळी तरुणवर्गाचा विचार करून मोदी सरकार तरुणांना महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.

तरुणांसाठी सुरु केलेल्या या योजनेचे नाव ‘पीएम युवा 2.0 योजना’ आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी दिली जात आहे. मेंटॉरशिप योजनेंतर्गत तरुणांना ही संधी दिली जात आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुण लेखकांना शिष्यवृत्ती म्हणून दरमहा 50 हजार रुपये दिले जातील.

30 वर्षाखालील कोणीही सहभागी होऊ शकते

30 वर्षांपर्यंतचे तरुण या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. भारतीय भाषा आणि इंग्रजीतील तरुण आणि नवलेखकांचा सहभाग लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना आणली आहे.

पंतप्रधान युवा योजनेच्या पहिल्या भागात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. देशात वाचन-लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

75 लेखक निवडले जातील

या योजनेअंतर्गत, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (NBT) द्वारे देशभरातील एकूण 75 लेखकांची निवड केली जाईल. मार्गदर्शन योजनेतील प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या शेवटी, शिष्यवृत्ती म्हणून दरमहा 50,000 रुपये आणि प्रत्येक तरुण लेखकाला सहा महिन्यांसाठी 3 लाख रुपये दिले जातील.

तुम्ही या भाषांमध्ये अर्ज करू शकता

22 वेगवेगळ्या भाषांचे जाणकार ‘पीएम युवा 2.0 योजने’मध्ये सहभागी होऊ शकतात. या भाषांमध्ये इंग्रजी, हिंदी, उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी यांचा समावेश आहे. .

करा असा अर्ज

सर्वप्रथम https://innovateindia.mygov.in/yuva/ या वेबसाइटवर जा.
येथे तळाशी डाव्या बाजूला, ‘Click here to submit’ वर क्लिक करा.
पीएम युवा 2.0 योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.
येथे तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू आणि सबमिट करू शकता.