PMKMY : सर्वसामान्य हितासाठी सरकार अनेक योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना होय. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वयानुसार ही रक्कम ठरवण्यात येईल, ज्याच्यानंतर त्यांना एका ठराविक कालावधीपासून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल.
वयोवृद्ध नागरिकांनी कोणावरही अवलंबून राहू नये, यासाठी ही योजना सुरू केली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर, तुम्हाला सर्व अटी माहिती असाव्यात, नाहीतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच जर तुम्ही सर्व मानकांची पूर्तता केली नाही, तर तुम्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी
जर तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वात अगोदर, तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असावे. तसेच तुम्हाला या योजनेत थोडी गुंतवणूक करावी लागणार आहे.
यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे असावे. यात तुम्हाला वयानुसार गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात 55 रुपये गुंतवावे लागणार आहे.
जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून या योजनेत सहभागी झाला तर तुम्हाला 110 रुपये गुंतवावे लागणार आहेत, तर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून या योजनेत सहभागी झाला तर तुम्हाला 210 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
मिळणार इतके पैसे
या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर त्यानुसार तुम्हाला वार्षिक 36,000 रुपये पेन्शनचा लाभ देण्यात येईल.