ताज्या बातम्या

POCO C51 : शानदार ऑफर! फक्त 549 रुपयात खरेदी करता येणार पोकोचा हा स्मार्टफोन, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

POCO C51 : पोको या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने काही दिवसांपूर्वी POCO C51 हा फोन लाँच केला होता. किमतीबाबत बोलायचे झाले तर हा फोन 9,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. मात्र या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे.

यावर मिळत असणाऱ्या डिस्काउंटमुळे तुम्हाला हा फोन फक्त 549 रुपयांना खरेदी करता येत आहे. अशी शानदार ऑफर फ्लिपकार्टवर मिळत आहे. यात कंपनीकडून 4GB RAM + 64GB स्टोरेज देण्यात येत आहे. दरम्यान काय आहे ऑफर? जाणून घ्या.

जाणून घ्या सवलत आणि ऑफर

कंपनीच्या फोनची फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे विक्री केली जात आहे. किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 9,999 रुपयांना लॉन्च केला होता, जो आता 3,000 रुपयांच्या सवलतीसह अवघ्या 6,999 रुपयांना विकला जात आहे.

इतकेच नाही तर आता तुम्ही कोणतीही ऑफर लागू न करता रु.3,000 च्या डिस्काउंटसह फ्लिपकार्टवरून Rs.6,999 मध्ये फोन खरेदी करू शकता. तर, ऑफर्सद्वारे फोनवर जास्त सवलत मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत फक्त 549 रुपये असणार आहे.

पहा बँक ऑफर

जर आपण बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले, तर फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करण्यासाठी कार्ड डिस्काउंट देण्यात येत आहे. जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरले तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्हाला विशेष किंमत ऑफर अंतर्गत कॅशबॅक किंवा कूपनद्वारे 3000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल.

असा खरेदी करा 549 रुपयांना

समजा तुम्हाला हा फोन 549 रुपयांना विकत घ्यायचा असेल, तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करावा लागणार आहे. तसेच या स्मार्टफोनवर 6,450 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. परंतु त्यासाठी, तुम्हाला एक फोन बदलावा लागणार आहे. जो नवीनतम मॉडेलमध्ये येण्याशिवाय तो चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे.

समजा तुम्ही बदललेल्या फोनवर तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटचा पूर्ण फायदा हा स्मार्टफोन तुम्ही 549 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts