Poco smartphone : Poco च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता Poco च्या काही स्मार्टफोनवर प्रचंड सवलत मिळत आहे. ही सवलत तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे.
कारण फ्लिपकार्टवर रविवार म्हणजे 15 जानेवारीपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही पोकोचे स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
1. POCO F4 5G
या स्मार्टफोनवर सर्वात मोठी सूट मिळत आहे त्यामुळे या डिव्हाइसचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांना मिळत आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह 6.67-इंच AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh बॅटरीसह येतो. तसेच हा स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.
2. POCO X4 Pro 5G
4,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीनंतर हा स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत शक्तिशाली खरेदी करण्याची संधी मिळत आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह असलेल्या, या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले कंपनीने दिला आहे. तसेच मागील पॅनलवर 64MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिली आहे. फोनमध्ये जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.
3. POCO M4 Pro 5G
शक्तिशाली कॅमेरा असलेल्या या फोनवर 4,750 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे . त्यामुळे तो 11,249 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये 5G Redmi MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आहे.
तसेच कंपनीने या फोनमध्ये 90Hz FHD+ डिस्प्ले आहे. 50MP कॅमेरा व्यतिरिक्त 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी या फोनमध्ये उपलब्ध आहे. बॅटरीला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
4. POCO M4 5G
फोनमध्ये सर्व प्रकारांवर 2,750 रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जात असून त्याची किंमत 10,249 रुपयांपासून सुरू होत आहे. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येतो आणि 90Hz फुल HD+ डिस्प्ले व्यतिरिक्त मोठी 5000mAh बॅटरी आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा व्यतिरिक्त, 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
5. POCO M5
यावर 2,500 रुपयांची सूट मिळत असून तो 9,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसर व्यतिरिक्त, फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी कंपनीने दिली आहे. या फोनचा 6.58 इंच 90Hz फुल HD+ डिस्प्ले 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह उपलब्ध आहे.
6. POCO M4 Pro AMOLED
AMOLED डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन 5,000 रुपयांच्या सवलतीनंतर 9,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. तसेच त्याच्या इतर व्हेरियंटवर 5,500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
या स्मार्टफोनला डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच-सॅम्पलिंग रेटसह येतो आणि मीडियाटेक हेलिओ G96 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 64MP AI ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.
7. POCO C31
या सेल दरम्यान, Poco चे बजेट डिव्हाइस 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येऊ शकतो, त्यावर 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. हे Media Helio G35 प्रोसेसरसह 5000mAh बॅटरी पॅक करते. 8000 रुपयांमध्ये हा उत्तम पर्याय आहे.