नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग; जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar Crime :-नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून विषप्रयोग करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे घडली आहे.

पीडितेच्या फिर्यादीवरून तिसगाव येथील सासरच्या तिघां विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे पती वैभव बाळासाहेब पातकळ, सासरा बाळासाहेब लक्ष्मण पातकळ व सासू विजया बाळासाहेब पातकळ (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, लग्नानंतर माहेरहुन आई-वडिलांकडून जमीन खरेदीसाठी चार लाख रुपये आणावेत म्हणून नवरा, सासरा, व सासू यांनी गाजराच्या हलव्यामध्ये विषारी औषध टाकून तो गाजराचा हलवा बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवाविहीतेने केला आहे.

नवविवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही संशयित फरार झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office