परीक्षेत डमी बसलेल्या तब्बल अकरा उमेदवारांवर पोलीस कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-सरकारी नौकरी मिळवण्यासाठी गैरमार्गाचा वापर अवलंबनाचे अनेक प्रकार याआधी जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान असाच एक प्रकार जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपूर्वी घडला होता.

या डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उमेदवार भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन दिली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारूप यादी प्रशासनाने जाहीर केली.

त्या उमेदवांना ३ ते ७ जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो व प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात ११ उमेदवार डमी आढळले.

यासंदर्भात आता वर्षभरानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या सूचनेवरून सामान्य प्रशासनच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी ९ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24