अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील विविध टपर्यावर धाड टाकुन 23 हजार रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे.
अधिक सविस्तर माहिती अशी कि, पाथर्डीचा मावा रोज मुंबई व कल्याण येथे खाजगी बसमधुन जातो. शिवाय तालुक्याच्या विविध भागातही मावा पुरविण्याचे काम येथील काही युवक करीत आहेत.
या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डीत छापा मारला. त्यांना समीर मुनीर शेख (इंदिरानगर), स्वप्नील राजेंद्र सरोदे (आखर भाग), सुरेश तुकाराम कोकाटे (रा.पिपंळनेर), किशोर रतन जगधने (रामगिरीबाबा टेकडी), अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनिल शिंदे, गणेश अशोक हारदे (रा.पाथर्डी) हे सुंगर्धी सुपारीपासून मावा तयार करताना आढळले.
यामधील समीर मुनीर शेख, स्वप्नील राजेंद्र सरोदे, सुरेश तुकाराम कोकाटे, किशोर रतन यांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनिल शिंदे, गणेश अशोक हारदे हे पोलिसांना पाहुन पळुन गेले आहेत.
त्यांच्याकडुन 23 हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. नगरच्या पोलिसांना येवुन कारवाई करावी लागते परतुं पाथर्डीचे पोलिस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांमधुन विचारला जात आहे.