अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अवैध दारू विक्री, वाळू वाहतूक, तीरट जुगार खेळण्यावर अकोले पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिसांनी शहरातील शाहूनगर परिसरातील अवैध दारू विक्री करणारे काशिनाथ भीमराव शिंदे व सुनील अर्जुन मेंगाळ या दोघांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडून ३४६० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. तसेच या दोघान्वर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तालुक्यातील देवठाण शिवारात शेतातील एका शेडमध्ये पैसे लावून तिरट जुगार खेळताना राजू बोडखे,
मच्छिंद्र लक्षमण साळुंके रा. नवलेवाडी, गणेश नामदेव बोडके रा. देवठाण, सोमनाथ बारकू उघडे रा, वीरगाव, अनुप केदार नापेड रा. संगमनेर या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून शुभम संजय चव्हाण यास अटक केली आहे. एकूण १५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.