बोठेचा लॉक आयपॅड अनलॉक करण्यासाठी पोलीस प्रशासनाची धावपळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता.

या आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

यापूर्वी पोलिसांनी बोठेचा मोबाईल, पंटर तनपुरेचे सात मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आता आयपॅडची तपासणी फॉरेन्सिकमार्फत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली होती. ही सुपारी 12 लाखाची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला याचा सुद्धा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार्‍या वस्तूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24