ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेदरम्यान हातचलाखी करणाऱ्या भामटयांना पोलिसांकडून अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- कर्जत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत हातचलाखीने चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल पंढरीनाथ विटेकर वय २५ वर्षे, रा. माऊली नगर, पेठ बीड, ता. जि. बीड, नदीम अख्तर फय्याज अहमद, वय ३० वर्ष, रा. आजाद नगर, मालेगाव जि. नाशिक अशी आहेत.

हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलिस स्टेशनला चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्ञानेश्वर प्रभाकर सायकर, रा. सायकर वस्ती, राशीन येथून सभेसाठी आले होते.

सायकर हे श्री संत गोदड महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंत्र्यांसोबत गेले. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पाठीमागे असलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे पॅंटची पाठीमागील खिशातील हात घालून पाकीट काढण्याचा प्रयत्न केला.

त्यांना ते जाणवल्याने त्यांनी अनोळखी इसमाचा हात पकडला. त्यावेळी त्या इसमाचे हातात सायकर यांना त्यांचे पाकीट दिसले. त्यावेळी त्याने सायकर

यांना जोराचा धक्का देऊन हातातील पाकीट हिसकावून साथीदारांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्याने जवळच बंदोबस्त करता हजर असलेले पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. कर्जत पोलीस स्टेशनला जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office