महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-संगमनेर शहरात एका डॉक्‍टरने महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्‍टरवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात राहाणारी विवाहिता उपचारासाठी डॉ. इरफान अली शब्बीर अली शेख याच्याकडे जात होती.

डॉ. शेख हा विवाहितेचा फॅमिली डॉक्टर होता. डॉक्टरची विवाहितेबाबत वाइट भावना तयार झाल्याने त्याने तिचा वारंवार पाठलाग सुरु केला.

बुधवारी त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. यामुळे विवाहितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी डॉ. शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी शेख यास अटक करून संगमनेर न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल टोपले करीत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24