वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत.

कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं आहे. कराडकर यांच्या फलटणच्या पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तेथे कराडकर यांच्यासोबत काही वेळ पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत माहिती अशी की, राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे.

याला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. साताऱ्यातही गुरुवारी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत आंदोलन झाले. हे आंदोलन बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती.

तसेच यावेळी बंडातात्या यांनी राजकीय नेत्यांविरोधात जोरदार टीका केली होते. बंडातात्या नेमके काय म्हणाले होते? बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा?

असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं.

बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी बंडातात्या कराडकर म्हणाले, “समजा ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप घेतला आहे त्यांचयासोबत फोनवर बोललो आहे मी.

जे वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता.” सर्व महाराष्ट्राल माहिती आहे.

फक्त आम्ही म्हणालो म्हणजे काय झालं. तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सर्व माहिती आहे असंही बंडातात्या कराडकर म्हणाले.