बॉक्सर खेळाडूवर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- किक बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय-25) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बर्हाणपूर येथे हि घटना घडली होती. हल्ला करुन फरार झालेल्या मुख्य आरोपीस शनिशिंगणापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून रविवारी अटक केली आहे.

चव्हाण यांच्यावर 15 जून रोजी कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरुन आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार फायर केले होते. गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी लगेचच फरार झाले.

दरम्यान शनिशिंगणापुरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व पथक तसेच गुन्हा अन्वेषणचे पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत होते.

दरम्यान पोलिसांनी एमआयडीसीतील कामगारांचा वेष घेवून पिंपरी चिंचवड येथील खराबवाडी येथे राहत असलेल्या प्रेयसीच्या घरातून मुख्य आरोपी बाळासाहेब भाऊसाहेब हापसे यास अटक केली. दुसरा आरोपी विजय भारशंकर अजुनही फरार आहे.

आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केल्याने तपासात अडचण येत होती. अखेर गुप्त बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर आरोपीस अटक करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24