सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- सोनई पोलिसांनी दोन वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगारास इमामपूर परिसरातून अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, 14 ऑगस्ट 2019 रोजी औरंगाबाद-नगर राज्य महामार्गावरील गुडलक हॉटेल घोडेगाव येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कृष्णा यलप्पा फुलमाळी (वय 28 रा. घोडेगाव) याने गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून सचिन गोरख कुर्‍हाडेचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

व तो फरार याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान गेल्या 2 वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी बाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी 30 जुलै रोजी रात्री दहा वाजता साध्या वेषात इमामपूर येथील गिरणीचा महादेव या मंदिर परिसरात छापा टाकून आरोपी फुलमाळी यास अटक केली.

सदर आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात चार व शिंगणापूर पोलीस ठाण्यात एका गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी फुलमाळी हा बेकायदा शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करणाऱा सराईत गुन्हेगार आहे

अहमदनगर लाईव्ह 24