अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील मंदिर दानपेट्या फोडी प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलसह 80 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजु ठमा मेंगाळ (दोघे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले) यांना रंगेहात पकडले तर यावेळी साथीदार विलास लक्ष्मण गावंडे (रा. उंचखडक खुर्द) हा फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन मोठ्या प्रमाणात मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत वरिष्ठांकडून सखोल तपास करण्याचे आदेश अकोले पोलिसांना दिले होते.
यानंतर अकोलेच्या पोलीस पथक प्रवरा नदीच्या पलीकडे, रस्त्याचे कडेला, महालक्ष्मी मंदिर परिसरात गस्त घालत होते. रात्रीच्या सुमारास तीन इसम हे संशयीत रित्या महालक्ष्मी मंदिराचे गेटजवळ दिसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या पथकाने नागरिकांचे मदतीने दोघांना पकडले तर यातील एक जण फरार झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून त्यांचे कडुन चोरीत वापरलेले साहित्य,
कटावणी, ग्रॅण्डर, रोख रक्कम व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.