अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- 30 लाखांहून अधिक किंमतीच्या खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणात दोघा सूत्रधारांना संगमनेर पोलिसांनी गजाआड केले आहे .
या चोरट्यांकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या तेलासह दीड लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर येथील सूरत येथील एकेटी लॉजिस्टीक या कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून संगमनेरातील अफजलखान साहेबखान पठाण (रा.मोमीनपुरा, संगमनेर) यांच्या मालकीच्या मालट्रकमधून चालक अरुण उदमले (रा.पोखरी हवेली, ता.संगमनेर)
याने तेलाचे डबे घेऊन डिलव्हरीसाठी घेतले. प्रत्यक्षात मात्र सदरचे वाहन पुण्यात न जाता राजगुरुनगर (खेड) येथे पोहोचले असता त्यातील तेलाचा सगळा माल दुसर्या वाहनात उतरविला गेला. याप्रकरणात एकेटी लॉजिस्टीक कंपनीचे अशोककुमार चौधरी यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला वाहनाचा चालक अरुण उदमले व मालक अफजलखान पठाण यांना या प्रकरणी आरोपी करुन तपास सुरु केला.
पोलिसांनी काष्टीत छापा घातला असता हा प्रकार अहमदनगरमधील नरेंदर राजेंद्रसिंग रोतेला (वय 41, रा.पाईपलाईन रोड) व अनिल भारत मीरपगार (वय 30, रा.तारकपूर) या दोघांनी केल्याचे समोर आले. दरम्यान संगमनेर शहर पोलिसांनी गोव्यात जावून त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नगरमध्ये छापा घालीत 9 लाख 83 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. या प्रकरणात अहमदनरमधील दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आले असून उर्वरीत मालाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.