हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दारुड्याला पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील इस इसम दारूच्या नशेत तर्रर्र होऊन हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत होता.

या दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास दिलीप शिंदे (वय 24) हा दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन गावात दहशत पसरवित होता.

तो लोकांच्या अंगावर धावून जाणे, मारहाण करणे तसेच शिवीगाळ करीत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. या घटनेची माहिती मिळताच

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गावात कर्मचार्‍यांना पाठवून विकास दिलीप शिंदे यास ताब्यात घेतले. त्याच्यावर कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24