अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- एका शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करून लग्नानंतर रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने घेऊन नवरी पळून गेल्याप्रकरणातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर व खंडाळा येथील आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जुन्नर शहरालगतच्या कबाडवाडी पाडळी येथील शेतकरी तरुण गणेश रामदास पवार याचे श्रीरामपूर तालुक्यातील एका तरूणीबरोबर लग्न लावून दिले.
यावेळी गणेश याने गणपत आबाजी चौधरी (रा. चांदवड, नाशिक), छाया बाबुराव गायकवाड, रुपाली बाळासाहेब शिनगारे, सुनीता बाळासाहेब शिनगारे (सर्व जण रा. खंडाळा, श्रीरामपूर), रखमाजी गाडे-पाटील (रा. बेलापूर, श्रीरामपूर) या पाचही जणांना 90 हजार रुपये रोख रक्कम दिली होती.
तसेच लग्नानंतर 10 दिवसांतच ही तरूणी घरातून निघून गेली. जाताना सर्व दागिने घेऊन गेली होती. त्यामुळे या पाच जणांनी मिळून लग्नाचा खोटा बनाव करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी गणेश रामदास पवार याने जुन्नर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द फिर्याद दाखल करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या सर्व आरोपींचा जुन्नर पोलिस शोध घेत होते. सायबरमार्फत या सर्वांचे मोबाईल लोकेशन काढून माहिती ,मिळाली. पोलीस पथकाने चांदवड व श्रीरामपूर येथे जाऊन गणपत आबाजी चौधरी (रा. चांदवड, नाशिक), छाया बाबूराव गायकवाड,
रुपाली बाळासाहेब शिनगारे, सुनीता बाळासाहेब शिनगारे (सर्व जण रा. खंडाळा, श्रीरामपूर), रखमाजी गाडे-पाटील (रा. बेलापूर, श्रीरामपूर) या पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.