अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे दारू अड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करणा-या आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातुन जेरबंद केल आहे.
जगन्नाथ जाधव,राहणार प्रिंप्री वळण असे आरोपीचे नाव असुन त्यास ३ जुन पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यामधे दारू विरोधी कारवाया करण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मोहीम सुरू केली आहे.
अनुषंगाने ५ मे रोजी वळण येथील दारू अड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचारी दिपक फुंदे,सचिन ताजने,सुशांत दिवटे या कर्मचा-यांवर कारवाई दरम्यान या आरोपींने दगडफेक फेक करून शासकीय कामात अडथळा आनला होतो.
पोकाॅ.सचिन ताजने यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ गुलाब जाधव, अशोक पवार, किरण गोलवड या तिघाविरोध शासकीय कामात अडथळा आणल्याप्ररणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासुन हे तिनही आरोपी फरार होते.
त्यातील मुख्य आरोपी जगन्नाथ जाधव याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहत येथुन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील,पोना.
दिनकर चव्हाण, पोकां.दिपक फुंदे,पोकाॅ.गणेश सानप आदिंनी यातील मुख्य आरोपी जगन्नाथ गुलाब जाधव यांच्या मुसक्या आवळल्या असुन कोर्टात हजर केले आहे.
त्यास ३ जुन पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.उर्वरित दोन आरोपी देखील लवकर जेरबंद करू असे पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील यांनी सांगितले आहे.