अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- संगमनेर शहर पोलिसांनी व्यापार्याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना गजाआड केले आहे.
या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एल. के. टी. लॉजिस्टिक कंपनीच्या माध्यमातून फॉर्च्यून सोया ऑईलचे डबे एका ट्रकमधून 30 लाख 6 हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे पुणे येथील बसंत ट्रेडिंग कंपनी यांना पोहोच करायचे होते. या तेलाचा मध्येच अपहार झाला होता.
तेलाचे डबे पुणे येथील कंपनीला पोहोच झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने अशोक कुमार रामनिवास चौधरी, रा. सुरत यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नरेंद्र राजेंद्रसिंग रोतेला (वय 41, रा. पाईपलाईन रोड,अहमदनगर), अनिल भारत मिरपगार (रा. तारकपूर, अहमदनगर), किशोर पदुने (रा. वाळूंज, पंढरपूर औरंगाबाद) व अजय कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यांच्याकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. सदर तेलाचेे डबे काष्टी येथे पोहोच झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
या आरोपींकडून 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अजय कांबळे हा आरोपी पसार झालेला आहे.