अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलीस पथकाकडून सातत्याने कारवाई सत्र सुरूच आहे.
नुकतेच घोडेगाव मध्ये अवैध दारूची विक्री करणार्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
हि कारवाई अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घोडेगावात अवैध दारूची विक्री होत असल्याच्या वाढत्या तक्रारीवरुन नगरच्या गुन्हे शाखेने दोन ठिकाणी कारवाई केली.
त्यातील पहिली फिर्याद हवालदार संदीप काशिनाथ घोडके यांनी दिली असून त्यावरून आरोपी सोमनाथ सारंगधर सोनवणे (वय 41) रा. घोडेगाव याच्यावर गुन्हा दाखल केला तर तर दुसरी फिर्याद ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दिली.
त्यावरुन आरोपी बाळू दशरथ गायकवाड वय (41) रा. घोडेगाव याच्यावर गुन्हा दाखल केला. हे दोघे घोडेगाव चौकात एका टपरीच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भिंगरी देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगलेले आढळून आले.
एका आरोपीकडून 1200 रुपये किमतीच्या भिंगरी देशी दारूच्या 180 मिलीच्या 20 सीलबंद बाटल्या तर दुसर्या आरोपीकडून 1020 रूपये किमतीच्या भिंगरी देशी दारूच्या 180 मिलीच्या 17 सीलबंद बाटल्या मिळून आल्या. आरोपींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.