पोलीस चोरट्यांचा पाठशिवणीचा खेळ, ‘या’ गावात पाच ठिकाणी घरफोड्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- चोरट्यांचा व पोलीसांचा पाठशिवणीचा खेळ काही संपेना, पोलीसांनी घरफोडीतील गुन्हेगार काही सापडेना. मागिल घरफोडीचा तपास लागत नाही तोच दुसरी घरफोडी पोलीसांसमोर उभी ठाकली आहे.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया  गावात चोरटयांनी धुमाकुळ घालत मेडिकल, किराणा दुकान, पानटपरी व काही घरांचे दरवाजे तोडून सुमारे १ लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

गुरूवारी मध्यरात्री नंतर सुमारे १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत गावातील प्रमुख बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकुळ घालत प्रदिप ढुस यांचे आकाश मेडिकलचे शटर वाकुन आत प्रवेश मिळवला.

गल्यातील तसेच बाजुला ठेवलेले रोख ५० हजार रूपये तर मेडीकल शेजारी असणारे किराणा दुकान   लक्ष्मी किराणा दुकानाच्या शटरच्या कड्या तोडुन टाॅमीने शटर वाकवण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यांनी आपला मोर्चा  जवळच असलेल्या कवाणे यांच्या अवधूत मेडिकलचे शटरची कडी कोयंडा तोडुन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोथे व कवाणे यांच्या दुकानांच्या शटरला सेंट्रल लाॅक असल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

त्यानंतर  समोरच असलेल्या संदीप करपे यांच्या करपे पाटील मेडिकलचे शटरची कडी तोडुन या दुकानातील गल्यातील १५ हजारांची रक्कम लंपास केली.

याच दुकानाशेजारी असलेल्या पानटपरीच्या खिडकीचे गज वाकवून यातील ३०० रूपये चोरट्यांनी पळवले. बंद घरांचे कुलपे तोडून चार ते पाच ठिकाणाहून या चोरट्यायांनी चाळीस ते पन्बानास हजाराचा ऐवज लुटुन नेला असावा असा अंदाज व्बयक्तत केला जात होता. गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तापस करीत आहे.

राहुरी तालुक्यात सध्या चोरटे व पोलीसांचा पाठशिवणीचा खेळ सुरु आहे.पहिल्या घरफोडीचा तपास लागत नाही तोच चोरटे दुसरी घरफोडी करुन पोलीसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24