अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वाळू तस्करीच्या अनेक घटना घडत आहेत. मोठा आर्थिक नफा दिसत असल्याने कायद्याला न जुमानत हे तस्कर खुलेआम आपला धंदा चालवत आहे..
मात्र याना वेळीच लगाम बसावी यासाठी पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली शिवारात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून दीड ब्रास वाळू जप्त केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोखरी हवेली येथे विद्युत उपकेंद्राजवळ विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती शहर पोलिसांंना समजली.
विज उपकेंद्राजवळ पोलीस गेले असता त्यांना ट्रॅक्टरमधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सहा हजार रुपये किंमतीची दीड ब्रास वाळू व 6 लाख 16 हजार रुपयांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त केला.
याबाबत पोलीस नाईक नितीन शिंदे यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन अमोल सोमनाथ वाळके (वय 28, रा. वाकणवस्ती, कोल्हेवाडी) व सचिन दिलीप लाटे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल व्ही. के. आहेर करत आहे.