अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-दुचाकीवर संशयरीत्या फिरत असलेल्या एका तरुणाने पोलिसांना कट मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना कोपरगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात पल्सरला बनावट नंबर प्लेट लाऊन तिच्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या सोमनाथ उर्फ साहील रामदास खलाटे (वय 26,रा. खलाटवाडी, ता.आष्टी जि.बीड) याला बुधवारी पोलिसांनी हटकले.
त्यावर तो पोलिसांना कट मारून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे, प्रकाश नवाळी,
यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेउन त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडील ७५ हजार रुपये किमतीची १५० सीसी पल्सर ही बनावट नंबर प्लेट असलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
दरम्यान अटकेतील आरोपी हा सराईत गुहेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.