अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-अवैध धंदे जिल्ह्यात डोके वर काढू लागल्याच्या घटना घडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
या घटनांना रोख बसावा यासाठी आक्रमक कारवाया देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतेच पोलीस पथकाने शेवगाव येथील एका हॉटेलवर कारवाई करत लाखोंचा माल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील हॉटेल साईसिद्धी येथे छापा टाकला. या छाप्यात अवैधरित्या साठवलेली 2 लाख 9 हजार 822 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केले.
याप्रकरणी हॉटेल चालक योगेश अंबादास गवळी याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहर टाकळी येथील हॉटेल साईसिद्धीमध्ये अवैध मद्यविक्री केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत देशी दारू, विदेशी दारू तसेच बीअरच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलिसांच्या कारवायांमुळे आता अवैध धंदे चालक देखील धास्तावले आहे.