अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने काहीजण वाळू उपसा करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान ही धडाकेबाज कारवाई श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलीस पथकाने केली.
याप्रकरणी पोलिसांनी सुनीलकुमार चूरामन महतो (वय 24 वर्ष रा धोडा वस्ती ता.बेरमो जि.बोकारो रा.झारखंड), मनजीत सिंग धुप्पड (रा आनंदवली नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (वय 24 रा. राजोहा ता. बहरी जिल्हा सिधी. मध्य प्रदेश),
युवराज सिंग केशर सिंग भंडारी व रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर) असे आरोपींचे नाव आहे. या छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून 2 पोकलेन, 1 बुलडोझर ,
1 ट्रक 1 मोबाईल, 4 ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपी विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.