अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आत शहरात ठिकठीकाणी धडक कारवाई करत ६ अवैध दारूभट्या उद्ध्वस्त केल्या. तसच ६ जणांवर गुन्हे दाखल केले.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील कुंभारतळ व एस.टी.बस स्टॅण्ड पाठीमागील सदाफुले वस्तीवरील गावठी हातभट्ठीच्या भट्टया असून त्यामुळे तेथील महिलांना याचा खुप त्रास होत आहे.
अशा प्रकारची महिलांनी तोंडी तक्रार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड याच्याकडे केल्याने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस पथकाने आज महिला दिनाचे औचित्य साधुन सकाळीच या ठिकाणी छापा टाकला.
यात सुमारे ३९ हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायण व ७ हजार रूपये किमतीची गावठी हातभटटीची तयार दारूचा नाश करून दारूच्या हातभटया उद्ध्वस्त केल्या आहेत.
याप्रकरणी अश्विनी अनिल पवार, बेबी रविंद्र पवार, सिताराम मनोहर पवार (सर्व रा.कुंभारतळ,जामखेड), रावसाहेब हिरामण पवार, विजय आत्माराम शिंदे, सुमन कल्याण ऊर्फ बबन काळे (सर्व रा.बस स्टॅण्ड पाठीमागे,
हंगे हॉस्पिटलसमोर जामखेड) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असुन. पुढील तपास पोनि.संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.शिवाजी भोस व पोना.किरण कोळपे हे करीत आहेत.