अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतने दारुबंदीचा प्रस्ताव सादर करुन संगमनेर पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्याकडे दारुबंदीसाठी पत्रव्यवहार केला होता,
अवैध दारु विक्रेत्यांना समज देऊनही सर्रासपणे दारु विक्री सुरू होती म्हणून डिग्रस ग्रामपंचायतने धडक निर्णय घेतला व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे, त्यातून पोलिसांनी कारवाई करत दारू विकणाऱ्या एकास अटक केली.
संचारबंदीच्या काळात देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला संगमनेर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पी.एस.आय सानप यांच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवार (३० एप्रिल) रोजी सकाळी ९:३०वाजता डिग्रस गावठाण हद्दीत करण्यात आली.
यावेळी आरोपीच्या ताब्यातून देशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सध्या संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात अवैध देशी दारूचा अवैध साठा विक्रीसाठी डिग्रस गावात असल्याची माहिती संगमनेर घुलेवाडी पोलिस ठाण्याचे पी.एस.आय सानप यांना मिळाली होती.
या माहितीवरून पथकाने अचानक छापा टाकुन देशी दारुचे बाँक्स ताब्यात घेऊन अवैध दारु विक्रेता सुनिल वाघ याला ताब्यात घेतले आहे, पुढील तपास व कारवाई पी.एस.आय व बीट हवालदार बढे करत आहे.